स्थापना 26th August 2013
रेको ट्रान्सफॉर्मेर प्रा. लि. मध्ये काम करणारा कामगार हा त्याचा आर्थिक विकास साधतच आहे. परंतु तो माणूस म्हणून सर्वांगाने विकसित व्हावा सामाजिक, राजकीय, व्यावहारिक, शैक्षणिक विश्वाशी पण तो तत्परतेने जोडला गेला असावा, एक माणूस म्हणून तो समाजाचे काही देणं लागतो, समाजाप्रतीच्या कर्तव्याची जाणीव त्याला असावी, स्वतःच्या आर्थिक विकासाबरोबर बौद्धिक आणि शारीरिक विकास पण त्याला साधता यावा. कामाच्या व्यापामुळे पडद्याआड झालेल्या त्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या सर्व गोष्टींचा कंपनीचे सर्वेसर्वा श्रीयुत रवींद्र वझे सर यांनी बारकाईने विचार केला व एक असे हक्काचे व्यासपीठ असावे कि ज्यामुळे या सगळ्या गोष्टी साध्य व्हाव्या हि कल्पना त्यांना सुचली आणि "रेको कम्युनिटी" या उपक्रमाची सुरुवात केली.
Learn More